Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मेट्रो रेल्वेसह सायकल ट्रॅक, मिठी नदी किनारा सुशोभीकरणाच्या कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मेट्रो रेल्वेसह सायकल ट्रॅक, मिठी नदी किनारा सुशोभीकरणाच्या कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह महापालिकेचे सहायक आयुक्त आदी मान्यवर उपस्थित होते.

मेट्रोच्या विशेषत: पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच टनेलिंगची कामे, पूर नियंत्रण, पंपिंग स्टेशन आदी बाबींचा यावेळी पालकमंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला. यानंतर झालेल्या बैठकीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर करावयाच्या सायकल ट्रॅकचा आढावा घेण्यात आला. हा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरात सायकल वापरास चालना देण्यास पर्यावरणपूरक आणि सहाय्यभूत ठरेल, असे पालकमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मिठी नदीची स्वच्छता आणि नदीच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण याबाबतही यावेळी माहिती घेण्यात आली. मुंबई शहरातून वाहणारी ही नदी  प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच तिचे सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *