Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई: आज रविवार दि. २६ रोजी उपनगरीय रेल्वे च्या सर्व मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे च्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग व हार्बरवर वडाळा ते मानखुर्द या दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. तसेच या मार्गावरील गाड्या सायंकाळी ६ पर्यंत १० मिनिटे उशिराने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे – मेन लाईन

मुलुंड ते माटुंगा अप (जलद मार्ग)

वेळ : २६ मे स. ११.१५ ते दु. ३.४५ पर्यंत

ब्लॉक च्या काळात सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जलद लोकल दिवा ते परळ दरम्यान स्लो लाईन वर वळवण्यात येतील. सीएसएमटी वरून सुटणाऱ्या जलद व अर्ध-जलद(सेमिफास्ट) लोकलना ब्लॉक काळात घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांत थांबा देण्यात येईल. या काळात मध्य रेल्वे च्या सोयीसाठी दिवा स्थानकापर्यंत पोहोचता यावे यासाठी दुपारी ३.४० वाजता एक विशेष लोकल सोडली जाणार आहे.

हार्बर मार्ग

वडाळा ते मानखुर्द (अप आणि डाउन मार्ग)

वेळ : २६ मे स. १०.४० ते दु. ४.१० पर्यंत

पनवेल ते सीएसएमटी मार्गावरील बेलापूर, पनवेल दरम्यानच्या व वाशी ते सीएसएमटी गाड्या ब्लॉक निमित्त रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत.

ट्रान्स-हार्बर

या मार्गावरील सर्व गाड्या आपल्या रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *