मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम गतिमान करण्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा
मुंबई: मिठी नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल घेतला. या नदीचे प्रदूषण निर्मूलन, स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी काल संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्रालयात आज यासंदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, अतिक्रमण निष्कासन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, राज्यातील नद्यांच्या पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण विभाग आता पुढाकार घेणार आहे. मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प गतिमान करावा. त्याबरोबरच मुंबईतील दहिसर, पोईसर, ओशिवरा या नद्यांचे कामही गतिमान करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
