विवाहित महिला मोदींना घाबरता कारण…: बसप अध्यक्षा मायावती
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्याच्या मतदाना आधी नेत्यांमधल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनीही जोर धरला आहे. वादग्रस्त वक्तव्यांनी तर नीचांकी पातळी गाठली आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परत एकदा वादग्रस्त टिप्पणी केली आहे.
बसप अध्यक्षा मायावती म्हणाल्या की, “मला असं समजलं आहे की भाजपात विशेषतः विवाहित महिला आपल्या नवऱ्यांना पीएम मोदी यांच्या जवळ जाताना पाहून घाबरून जात आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्या महिलांना भीती आहे की पंतप्रधान मोदी त्यांनाही आपल्या बायको सारखं आपल्या पत्नीबरोबर वागायला लावून दूर करायला करवतील.” हे विधान करून मायावती यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पत्नीलाही राजकीय वादात ओढलं आहे.
मायावती पुढे म्हणाल्या की, “भाजपचे लोक महिलांचा सन्मान करत नाहीत. अगदी राजकीय स्वार्थासाठी पीएम मोदी यांनी आपल्या पत्नीलाही सोडून दिलं आहे. तसेच पंतप्रधान मोदी जर राजकीय फायद्यासाठी आपल्या पत्नीला सोडू शकतात तर ते देशातल्या आया-बहिणींना कसा न्याय देऊ शकतात. कसा त्यांना सन्मान देतील.”
