Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पोटरा, तिचं शहर होणं, पाँडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई, दि. १५ : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा, तिचं शहर होणं, पाँडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

सदर ५ मराठी चित्रपटांच्या निवडीसाठी ५ तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीत निर्माती अभिनेत्री किशोरी शहाणे वीज, एफटीआयआय चे धीरज मेश्राम, युनेस्को चे ज्युरी मनोज कदम, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, चित्रपट लेखक व दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता. या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे २५ चित्रपटांचे परीक्षण करत या ५ चित्रपटांची निवड केली आहे. हे चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रत्येक चित्रपटाचे दोन प्रतिनिधी या प्रमाणे ५ चित्रपटाचे १० प्रतिनिधी पाठविण्यात येणार आहे.

या चित्रपटांच्या निर्मात्यांचे व संपूर्ण चमुचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *