उद्याचा मराठा समाजाने पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ मागे
मुंबई, दि.९: सर्वोच्च न्यातालयाच्या मराठा आरक्षणाला स्थिगिती देण्याच्या निर्णयाविरोधात उद्या दि. १० ऑक्टोबर रोजी होऊ घातलेला महाराष्ट्र बंद सकल मराठा महासंघाने रद्द केला आहे. या संदर्भात माहिती देताना अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या त्यामुळे आम्ही उद्याचे महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेत आहोत.”
या संदर्भात काल उशिरा सह्याद्री अतिथीगृहात मराठा समाजातल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली. यावेळी मंत्री अशोक चव्हाण, ऍड. अनिल परब, विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
