Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण तालुक्यातील आवरे येथे विकासकामांचे माजी शिवसेना आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

आवरे येथे रस्त्याचे काम व आवरे येथे हायमास्ट बसविणे आदि कामांचे भूमिपूजन

उरण, दि.९(विठ्ठल ममताबादे): शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत उरण तालुक्यातील आवरे येथे रस्त्याचे काम व आवरे येथे हायमास्ट बसविणे आदि कामांचे भूमिपूजन माजी आमदार मनोहरशेठ यांच्या शुभहस्ते पार पडले. तसेच कडापे येथील शाळा दुरुस्तीचे काम देखील या योजेनेअंतर्गत मंजूर झालेले आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा कामगार नेते महादेव घरत, आवरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच निराताई पाटील, शाखाप्रमुख सुनिल ठाकूर, शिक्षकसेना कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर, महेश गावंड, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनिराम पाटील, युवासेना अधिकारी अमित म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अरुण गावंड, अनिल पाटील, भाई पाटील, के. टी. गवंड, ना. क. गावंड गुरुजी, बाळकृष्ण गावंड, अरुण थळी, सोहम भोईर आदी उपस्थित होते. तसेच यावेळी माजी आमदार मनोहर भोईर यांनी आवरे गावातील स्वयंभू भोलेनाथाचे दर्शन घेतेले. रस्त्याचे व हायमास्टचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थांनी माजी आमदार मनोहर भोईर व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *