मोदींच्या प्रश्नावर मणिशंकर अय्यर भडकले, पत्रकाराला पंच दाखवून म्हणाले; एकंच मारिन
शिमला: काँग्रेस चे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मंगळवारी पुन्हा आपला तोल गमावला आहे. त्याचं झालं असं की पत्रकारांनी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीं बाबत प्रश्न विचारले होते. पण यावर अय्यर नाराज झाले. त्यांनी पत्रकारांना मूठ आवळून फाईट दाखवली व ते म्हणाले की मी तुम्हाला मारून टाकीन. अय्यर यांनी मे २०१७ रोजी मोदींना नीच असे संबोधले होते. त्यानंतर त्यांची काँग्रेस पक्षातून काहि काळासाठी हकालपट्टीही झाली होती. त्या नंतर कालच १४ मे रोजी अय्यर यांनी मी स्वतःच्या वक्तव्यावर ठाम आहे व यावर वाद घालण्यात मला अजिबात इच्छा नाही असे वक्तव्य केले होते.
पत्रकारांच्या प्रश्नावर अय्यर म्हणाले की, “भारतात एकच व्यक्ती आहे, ज्याचे तिखट हल्ले आपण नाही पाहिलेत, त्यांना प्रश्न विचारा. ते तुमच्याशी यासाठी बोलत नाहीत कारण ते घाबरट आहेत.” भडकलेले अय्यर नंतर म्हणाले की तुम्ही मला आता अजून कोणताच प्रश्न विचारू शकत नाही. पत्रकाराने त्यांना नाराज होऊ नका असेही सांगितले. शेवटी जाताजाता अय्यर यांनी पत्रकाराला अपशब्द वापरला.
