आ. डॉ. मनीषा कायंदे यांच्या “ठाकरे सरकार – योजना शासनाच्या लाभ जनतेचा” या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
मुंबई, दि.२२: “ठाकरे सरकार – योजना शासनाच्या लाभ जनतेचा” या शिवसेना प्रवक्ता आणि विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या पुस्तकाचे विमोचन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे पार पडले. याप्रसंगी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री अनिल परब, महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान उपस्थित होते.
