Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जासई येथील शिवस्मारक जनतेसाठी खुले करावे – कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी

जासई येथील शिवस्मारक जनतेसाठी खुले करावे – कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी

उरण, दि.२४(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘शिवस्मारक’ रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असून जासई येथील शिवस्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे यासाठी जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जे.एन.पी.टी प्रशासनाकडे मागणी केली आहे. या संदर्भाचे निवेदन घेऊन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण विधानसभा प्रभारी अखलाक शिलोत्री, फिशर मॅन काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष मार्तंड नाखवा यांच्या शिष्ठमंडळाने आज जे.एन.पी.टी चे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन त्यांना याबाबत चे निवेदन दिले. उन्मेष वाघ यांनी सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन सदरचे शिवस्मारक येत्या १ डिसेंबर २०२१ पासून जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले. जे.एन.पी.टी चेअरमन संजय सेठी यांनाहि या बाबतचे निवेदन दिले असुन त्यांचे स्वीयसहाय्यक पद्मनाभान यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे. त्यांनीहि याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी काँग्रेस शिष्ठमंडळाने जे.एन.पी.टी. प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. आता १ डिसेंबर पासून शिवस्मारक सर्वांसाठी खुले होणार असल्याने दास भक्तांमध्ये, शिव भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *