Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कामगार नेते व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड चालूच

कामगारांना मिळाली भरघोस पगारवाढ

उरण, दि.३(विठ्ठल ममताबादे): कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली असताना उद्योगधंदे सुद्धा सांभाळणे कठीण जात आहे. अशा परस्थितीत सुद्धा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना, व्यवस्थापन व कामगार यांची योग्य सांगड घालत कामगारांना स्वाभिमानाने जगता येईल असे प्रयत्न करत आहे. कोरोनाचा कोणताही परिणाम संघटनेच्या कामकाजावर झालेला नाही. महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली दर वर्षी साधारणतः संघटनेच्या माध्यमातून जवळपास २० ते २२ करार होत असतात. त्याप्रमाणे जानेवारी २०२१ पासूनच्या या १२व्या करारानुसार भेंडखळ येथील हिंद टर्मिनल मधील मे. पिनाकल मारिन सर्व्हिस मधील कामगारांना तब्बल ७,५०० रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली. हा करार तीन वर्षांचा आहे. यामध्ये कामगारांना पहिल्या वर्षी ६,००० (सहा हजार), दुसऱ्या व तिसऱ्या वर्ष्या साठी प्रत्येकी ७५०(सातशे पन्नास)अशा प्रकारे वेतनवाढ करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक कामगारास दरवर्षी १४ टक्के बोनस देण्यात येईल तसेच प्रत्येक कामगारांना ३,००,००० (तीन लाख रुपयांचा)चा मेडिक्लेम सुद्धा देण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक कामगारांस ऐरिअसच्या रूपाने १,००,००० ते १,२५,०००(एक लाख ते सव्वा लाख रुपये) मिळतील अशा प्रकारचा ऐतिहासिक करार कामगार नेते महेंद्र घरत यांच्या ऑफिस मध्ये करण्यात आला.

यावेळी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत, संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष किरीट पाटील, संघटनेचे संघटक योगेश रसाळ, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र फिशर मॅन संघटनेचे उपाध्यक्ष मार्तंड नाखवा, कंपनी व्यवस्थापनातर्फे संतोष जैन (डायरेक्टर) कामगारांच्या वतीने लंकेश ठाकूर, प्रांजल भोईर, जयेश कडू, देवेंद्र ठाकूर, हरेश ठाकूर, मनोज पाटील, सर्वेश पाटील, रविंद्र पाटील, संदेश भोईर, विशाल ठाकूर, मनोज ठाकूर यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व कामगारांनी कामगारनेते व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांचे आभार मानले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *