महाविकास आघाडीतल्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप येत्या सोमवारी व्हायची शक्यता
महाविकास आघाडीतल्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप येत्या सोमवारी व्हायची शक्यता असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार काही नवीन विभाग सुरु करण्यासंदर्भात विचार करत असल्याचंही मलिक म्हणाले.
खातेवाटपावरुन आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या कथित वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी ही माहिती दिली.
