देशभर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी, तर देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची ११८ वी जयंती आज साजरी करण्यात आली. या निमित्ताने या दोन्ही राष्ट्रपुरुषांना देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं.
आज नवी दिल्लीत महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळी राजघाट इथं सर्वधर्मीय प्रार्थना सभा आयोजित केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अनेक केंद्रीय मंत्री, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही गांधीजी आणि शास्त्रीजींनी आदरांजली वाहिली.
