महाराष्ट्राचा रणसंग्राम सुरू, आजपासून आचारसंहिता लागू
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीची दिनांक जाहीर करण्यात आली आहे. २१ ऑक्टोबर मतदान तर २४ ऑक्टोबर ला निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. आज पासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या २८८ आणि हरियाणातील ९० जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणूक तपशिल:
अर्ज भरण्याची दिनांक : २७ सप्टेंबर
अर्ज भरण्याची शेवटची दिनांक : ४ ऑक्टोबर
अर्ज छाननी : ५ ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक : ७ ऑक्टोबर
मतदानाची दिनांक : २१ ऑक्टोबर
निकाल : २४ ऑक्टोबर
