Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रातल्या ६ जागांसह राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर

महाराष्ट्रातल्या ६ जागांसह राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर

नवी दिल्ली, दि.१२: राज्यसभेच्या ५७ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यात महाराष्ट्रातल्या ६ जागांचा समावेश आहे. एकूण १५ राज्यात ही निवडणूक होणार असून येत्या २४ मे रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होईल.

३१ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. १० जूनला मतदान होणार असून मतमोजणी लगेचच करुन निकाल जाहीर होतील. ५७ सदस्यांचा कार्यकाल येत्या जून ते ऑगस्ट दरम्यान संपत असून त्यात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयुष गोयल, मुख्तार अब्बास नकवी, आर. पी. सिंग तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, कपिल सिब्बल, अंबिका सोनी इत्यादींचा त्यात समावेश आहे.

महाराष्ट्रातून निवडून गेलेले संजय राऊत, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, विकास महात्मे, आणि विनय सहस्रबुद्धे हे सदस्यही या काळात निवृत्त होत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचाही कार्यकाळ या अवधीत संपत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *