राज्यात आजही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
पुणे, दि.२९: राज्याच्या सर्वच भागांमध्ये तुरळक ठिकाणी आजही पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. या दरम्यान जोरदार वारे वाहण्याची तसंच काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान तापमानात फारसा फरक नाही. विदर्भात सर्वत्र पारा सरासरी ४२ अंशांच्या वरच होता. ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.
