तापी नदीवरील चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प दोन महिन्यांपासून बंद
नंदूरबार, दि. ३०: नंदूरबार जिल्ह्यात तापी नदीवर चारशे कोटी खर्च करून दोन बॅरेज तयार करण्यात आले आहेत. या बॅरेजेसमुळे सिंचनाची मोठी सोय होणार असून नंदूरबार जिल्ह्यातील पीके आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा होईल. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकल्पाचे काम रखडले असून वीज पुरवठाही खंडित झाला आहे. ६० हजार रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढवली आहे. जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळे नंदूरबार जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवणार आहे.
या प्रकल्पाद्वारे तापी नदीचे पाणी महाराष्ट्राच्या वाटेला १३ टीएमसी एवढे आहे. परंतु जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा गुजरात राज्यात जात असल्याचीही बाब समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील उद्योग गेले तसेच आता महाराष्ट्राचे हक्काचे पाणीही गुजरातला जाऊ देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
*फोटो प्रतीनिधिक आहे
