Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video पहा : माधुरीचे ‘मार डाला’नंतर ‘तबाह हो गए’ गाणे सोशल मीडियावर हिट

Featured Video Play Icon

Video पहा : माधुरीचे ‘मार डाला’नंतर ‘तबाह हो गए’ गाणे सोशल मीडियावर हिट

आपल्या नृत्याने अनेक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरीचा आगामी चित्रपट ‘कलंक’मधील ‘तबाह हो गए’ हे गाणे रिलीज झाले आहे. ‘तबाह हो गए….’ या गाण्यामुळे माधुरीच्या ‘देवदास’ या चित्रपटातील साकारलेली ‘चंद्रमुखी’ आठवते.

‘कलंक’ या चित्रपटातील ‘तबाह हो गए’ हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. अमिताभ भट्टाचार्यलिखित हे गाणे प्रीतम ने संगीतबद्ध केले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान आणि रेमो डिसूझा यांनी केली आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये माधुरीने केशरी रंगाचा लाँग लेहंगा घातला आहे.

अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘कलंक’ या चित्रपटात माधुरीसोबत आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर या चित्रपटात माधुरी आणि संजय दत्त ही जोडी अनेक वर्षांनी प्रेक्षकांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘कलंक’ हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *