Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

के. टी. नगर रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था, लवकरच होणार लोकार्पण

आमदार प्रवीण दटके यांचे सहकार्य

नागपूर, दि.२५: नागपूर महानगरपालिकेच्या के. टी. नगर रुग्णालयामधे या आठवड्यापासून कोविड रुग्णांचा उपचार करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. १०० खाटांच्या रुग्णालयासाठी आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून २५ ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. आता हे रुग्णालय जनतेच्या सेवेत लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिला.

के. टी. नगरच्या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी डॉक्टर्स, नर्सेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दटके यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा व्यवस्था झाली आहे. या वेळी माजी मंत्री डॉ. परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे, आरोग्य समिती सभापती महेश महाजन, माजी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, धरमपेठ झोनचे सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक विक्रम ग्वालबंशी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त प्रकाश वराडे इत्यादी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *