Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा रणसंग्राम २०२४ : भाजपने २४, शिवसेना ठाकरे गटाने १७, कॉंग्रेसने ७ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने २ जागांवर जाहीर केले उमेदवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष(शरद पवार)गट व शिवसेना (शिंदे) गटाकडून अद्याप न जागांची न उमेदवारांची केली घोषणा

मुंबई, दि. २७: लोकसभा निवडणूक २०२४ चा रणसंग्राम सुरु झाला असून एव्हाना भाजपप्रणित महायुती व विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी आपापले उमेदवार व मतदारसंघ जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात महायुतीत भाजप, शिवसेना(शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट) यांच्यात तर महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये काही जागांवर अद्याप एकमत होताना दिसत नाहीये. भारतीय जनता पक्षाने २४, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने १७, कॉंग्रेसने ७ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार) गटाने २ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष(शरद पवार)गट व शिवसेना(शिंदे) गटाने अद्याप आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही.

शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी :

नरेंद्र खेडेकर – बुलढाणा, यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख, हिंगोली – नागेश पाटील-आष्टीकर, परभणी – संजय जाधव, संभाजी नगर – चंद्रकांत खैरे, नशिक – राजाभाई वाजे, ठाणे – राजन विचारे, मुंबई उत्तर-पश्चिम – अमोल किर्तीकर, ईशान्य मुंबई – संजय दिन पाटील, मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई, दक्षिण मुंबई – अरविंद सावंत, रायगड – अनंत गीते, मवाळ – संजय वाघेरे-पाटील, शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे, धाराशिव – ओमराजे निंबाळकर, सांगली – चंद्रहार पाटील, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी :

नंदुरबार – डॉ. हीना गावित, धुळे – सुभाष भामरे, जळगाव – स्मिता वाघ, रावेर – रक्षा खडसे, अकोला – अनुप धोत्रे, वर्धा – रामदास तडस, नागपूर – नितीन गडकरी, भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे, गडचिरोली-चिमूर – अशोक नेते, चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, नांदेड – प्रताप पाटील-चिखलीकर, जालना – रावसाहेब दानवे, दिंडोरी – डॉ. भारती पवार, भिवंडी – कपिल पाटील, मुंबई उत्तर – पियुष गोयल, ईशान्य मुंबई – मिहीर कोटेचा, पुणे – मुरलीधर मोहोळ, अहमदनगर – सुजय विखे-पाटील, बीड – पंकजा मुंडे, लातूर – सुधाकर शृंगारे, सोलापूर – राम सातपुते, माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगली – संजयकाका पाटील

कॉंग्रेसने जाहीर केलेली उमेदवार यादी :

नंदुरबार – गोवल पाडवी, अमरावती – बळवंत वानखेडे, रामटेक – रश्मी बर्वे, नागपूर – विकास ठाकरे, भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूर – डॉ. नामदेव किरसान, नांदेड – वसंतराव बळवंतराव चव्हाण, पुणे – रवींद्र धंगेकर, लातूर – शिवाजीराव काळगे, सोलापूर – प्रणिती शिंदे, कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती

राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) उमेदवार यादी :

शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील, रायगड – सुनील तटकरे

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *