संसदेत आजही विरोधकांचा गदारोळ; लोकसभेत आज ४९ खासदारांचं झालं निलंबिन
नवी दिल्ली, दि. १९: संसदेच्या सुरक्षेचं उल्लंघन झाल्याप्रकरणी संसदेत आजही विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेतल्या एकोणपन्नास विरोधी पक्ष सदस्यांना नियमबाह्य वर्तनाच्या कारणावरून या अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानानं मंजूर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे राज्यातले खासदार निलंबित झाले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे शशी थरूर आणि मनीष तिवारी, नॅशनल काॅन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, संयुक्त जनता दलाचे राजीव रंजन सिंग यांचा निलंबित सदस्यांमधे समावेश आहे. हे निलंबन उर्वरित अधिवेशन काळासाठी आहे.
Source – AIR
