औरंगाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या संपूर्ण लॉकडाऊन
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या पूर्णपणे टाळेबंदी पाळण्यात येत आहे. नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करण्याचं आवाहन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीनं केलं आहे. या काळात वैद्यकीय आणि संबंधित सेवा, पेट्रोल पंप, किराणा, दूध-फळं तसंच भाजी विक्री सुरु राहणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल औरंगाबाद शहरात विविध भागात फिरून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. नियमभंग करणाऱ्या अनेक दुकानांवरही त्यांनी कारवाई केली. काल एकूण २४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
