लातूर जिल्ह्यात ३० ऑगस्टपर्यंत विवाह समारंभाचं आयोजन करण्यास परवानगी नाही
लातूर: लातूर जिल्ह्यात ३० ऑगस्टपर्यंत कुठल्याही सभागृहात विवाह समारंभाचं आयोजन करायला परवानगी दिली जाणार नाही. त्याऐवजी नागरिकांनी नोंदणीकृत विवाह पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
लातूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची अँटीजेन चाचणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Source-AIR
