Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गानकोकीळा लता मंगेशकर हॉस्पिटलमधून परतल्या घरी, मानले साऱ्यांचे आभार

गानकोकीळा लता मंगेशकर हॉस्पिटलमधून परतल्या घरी, मानले साऱ्यांचे आभार

मुंबई: गेले २८ दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गानकोकीळा लता मंगेशकर आज बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटर द्वारे साऱ्यांना दिली आहे. त्यांनी या ट्विट मध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे, हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

आपल्या ट्विट मध्ये त्या म्हणाल्या की, “नमस्कार! गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात होती. मला न्यूमोनिया झाला होता. डॉक्टरांचं असं मत होतं की मी पूर्ण बारी व्हावी आणि घरी जावं. आज मी घरी परत आली आहे. ईश्वर, माई-बाबा यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आता ठीक आहे. मी आपण सर्वांची हृदयापासून आभारी आहे.”

तसेच त्यांनी ब्रीच कॅन्डी मधील सर्व डॉक्टर आणि परिचारिकांचेही आभार मानले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *