कुर्ल्यातील बेस्ट बसच्या धडकेतील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून व मुंबई महापालिकेकडून अर्थसहाय्य
मुंबई, दि. १०ः मुंबईत कुर्ला येथे बेस्ट बसच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या सातवर पोहचली आहे. तर, जखमींची संख्या ४८ झाली आहे. जखमींना उपचारासाठी मुंबईतील विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातातल्या जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Source – AIR
