Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे त्रंबकेश्वर नगरपालिकेचे आदेश

कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे त्रंबकेश्वर नगरपालिकेचे आदेश

हरिद्वार येथील कुंभ मेळ्याला लाखोंच्या संख्येने साधू, संत, भाविकांची गर्दी होत आहे. यावेळी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करण्यात आलेली दिसली. पहिल्याच शाही स्नानानंतर हजारोंच्या संख्येने भाविक कोविड बाधित झाले. आता या कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना चौदा दिवस गृह विलगीकरण ठेवावं यासाठी त्रंबकेश्वर नगरपालिकेनं दहा आखड्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

त्रंबकेश्वर येथे दहा शैव आखाडे आणि अनेक आश्रम असून त्यातले अनेक साधू-महंत हरिद्वारला कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्यांची यादी त्रंबकेश्वर नगरपालिकेने मागवली आहे. परतलेल्या साधूंनी आधी कोविड चाचणी करावी, आणि नंतर गृह विलगिकरणात राहावं, असं न करता ते रस्त्यावर फिरताना आढळले तर कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेने दिला आहे.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *