मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची संततधार
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रात कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मुंबईत देखील मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी आज मुंबईत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत.
मुंबईत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं जोर धरला आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड आणि उस्मानाबाद इथं पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती नाही मात्र कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवरून वहात आहे.
आतपर्यंत ३ हजार ६४९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पुढचे चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. याच काळात विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पाऊस पडेल. असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
