मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी आधी ठरवल्यापेक्षा अधिकच्या विशेष रेल्वेगाड्या सोडणार
मुंबई, दि. ८: गणेशोत्सवासाठी आणखी ३२ गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्या सोडणार असल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे. आधी जाहीर केलेल्या ७४ गाड्यांव्यतिरिक्त या जास्तीच्या ३२ गाड्या असणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळातील गर्दी टाळण्यासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.
