Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पेडणे येथे अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्याने कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या प्रभावित

पेडणे येथे अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्याने कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या प्रभावित

पेडणे, दि. १०: गोव्यातल्या पेडणे येथे अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्याने कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस तसंच, मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मडगावहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस या गाड्याही आज रद्द झाल्या आहेत.

काल सुटलेली हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस पनवेल-लोणावळा-पुणे-मिरज-मडगाव या मार्गे वळवण्यात आली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरच्या तुळशी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. मंडणगड ते अंबडवे दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कापण्याचं काम सुरू आहे.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *