कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आलेल्या रमेश कीर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा
रत्नागिरी/मुंबई, दि. १९: आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते रमेश कीर यांना पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थोड्याच वेळापूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाविकास आघाडीतील एक भिडू असलेल्या कॉंग्रेस उमेदवाराला आपला पाठींबा जाहीर केला आहे. रमेश कीर हे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
Photo Credit – AIR
