कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांदरम्यानचा भुईबावडा घाट पूर्ववत सुरू
सिंधुदुर्ग, दि.२६: सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांदरम्यानचा भुईबावडा घाट कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. कोल्हापूर प्रशासनानं गुरुवारी सायंकाळी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता.
मार्ग बंद असल्याने व्यापारी वर्गासह नागरिकांची गैरसोय होत होती. माध्यमातून याबाबतचं वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अखेर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यांनतर हा मार्ग काल सकाळ पासून वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
फोटो प्रातिनिधिक आहे
