Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खेलो इंडिया जुदो स्पर्धेत रायगड चे खेळाडू चमकले

खेलो इंडिया जुदो स्पर्धेत रायगड चे खेळाडू चमकले

उरण, दि. २५(विठ्ठल ममताबादे): अंधेरी(मुंबई) येथे आयोजित मुंबई सिटी जुदो असोसिएशन यांनी ‘खेलो इंडिया दस का दम’ स्पर्धा भरविली होती. या स्पर्धेत रायगडच्या मुलींनी घवघवीत यश संपादन केले आहेJ. श्वेता मोरे – दोन गोल्ड मेडल, तेजस्वी इंगोले – सिल्व्हर मेडल तर अमिता घरत, अमिषा घरत यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत एकूण २५९ मुलींनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटक नीता ताटके (उप प्राचार्य – रूपारेल कॉलेज माटुंगा), हिमानी परब (मल्लखांब पट्टू) हे प्रमुख पाहुणे लाभले. बक्षिस वितरणासाठी दीपाली दरेकर ह्या शिव (वेट लिपटिंग आणि राष्ट्रीय कबड्डीपट्टू), श्री स्वार्थ दास (सायकलिंग मध्ये छत्रपती पुरस्काराने सन्मानित), दीप्ती (प्रिन्सिपल बिलाबोग इंटरनेशनल स्कूल), मिस अंगोळकर (क्लासिकला डान्सर कोरेओग्राफर बॉलिवूड पिचर), तसेच यां स्पर्धेचे इंचार्ज पूनम समेल, संपदा फाळके, शिल्पा सेरींगर, रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, या स्पर्धेचे प्रमुख पंच ओंकार घरत, राजश्री कोळी यांनी सदर स्पर्धेचे काम पाहिले व ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. तसेच कोच अजिंक्य भगत, सिहान राजुकोळी, महेंद्र कोळी गोपाळ म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *