Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंची घोडदौड चालूच

पदक तालिकेत महाराष्ट्र प्रथमस्थानी तर हरियाणा आणि मध्यप्रदेश अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी

भोपाळ, दि. ६: मध्यप्रदेश मध्‍य प्रदेशात सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत काल दोन नवे राष्ट्रीय विक्रम नोंदले गेले. दिल्लीच्या सोनमने २०० मीटर ची अडथळा शर्यत केवळ ६ मिनिटं ४५ सेकंदाच्या विक्रमी वेळेत पूर्ण केली, तर राजस्थानच्या सिद्धार्थ चौधरीने २१ पूर्णांक ४ शतांश मीटर लांब गोळाफेक करून नवा विक्रम नोंदवला. महाराष्ट्राची अव्वल जिम्नॅस्ट संयुक्ता काळेने काल ४ सुवर्ण पदकांसह एकूण ५ पदकं पटकावली. संयुक्ताने मागच्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतही ५ सुवर्ण पदकं जिंकली होती.

या स्पर्धेच्या अॅथलेटिक्स प्रकारातल्या मुलांच्या स्पर्धेत मध्य प्रदेशाच्या खेळाडूंनी तर मुलांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदक पटकावलं. त्यामुळे २६ सुवर्ण  पदकांसह एकूण ७९ पदकं पटकावणारा महाराष्ट्र पदक तालिकेत अग्रस्थानी असून २२ सुवर्ण पदकांसह एकूण ५३ पदकं पटकावणारे हरियाणा दुसऱ्या स्थानी तर २१ सुवर्ण पदकांसह एकूण ५३ पदकं पटकावणारा यजमान मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या आजच्या सातव्या दिवसापासून जल क्रीडा प्रकारातली कॅनो स्ल्यालम स्पर्धा सुरु होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *