खारघर येथे ग्लोमॅक्स मॉल मध्ये स्पा च्या नावाखाली बिनदिक्कत चालतो वेश्याव्यवसाय?
(प्रतिनिधी- सुप्रिया) सध्या मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात मसाज पार्लर च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. पण आता हे लोण शेजारी असलेल्या नवी मुंबई सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरातही तितक्याच वेगाने पसरताना दिसत आहे. अशाच प्रकारचे उद्योग मध्यम वर्गीय तसेच उच्च मध्यमवर्गीय लोकांचा मोठा भरणा असलेल्या खारघर सारख्या हायटेक भागातही होत असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत येत होत्या. खारघर स्टेशन ला लागून असलेल्या ‘ग्लोमॅक्स’ नावाच्या मॉल जवळ “लेमन स्पा” नावाचा एक मसाज पार्लर चालवला जातो. जो फक्त देखावा आहे. लोकांकडून आलेल्या तक्रारींची थेट शहानिशा करण्यासाठी तसेच या बाबत या अस्थापनाच्या मालकाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही येथे आमचे प्रतिनिधी पाठवले होते. याबाबतचे स्पष्टीकरण देण्याबाबत लेखी आणि अधिकृत मागणी करत असल्याचे पत्र आम्ही येथील कर्मचाऱ्यांकडे दिले. यावेळी आमच्या प्रतिनिधींच्या असे लक्षात आले की हा स्पा “रोहित म्हस्के” ( +919324232625 ) नामक कोणी इसम चालवत असून त्याने आमच्या प्रश्नांना कॉल वर बगल देण्याचाच प्रयत्न केला. आजही (दि.२९) आमच्या प्रतिनिधीने आमच्या विभागीय कार्यालयात जाऊन आपली प्रतिक्रिया नोंदवण्याबाबत पाठपुरावा केला पण येथेही संशयास्पद वर्तन करत रोहित म्हस्के याने खारघर येथील पार्लर मध्ये भेटावयास येण्यास सांगितले. पण विभागीय कार्यालयात येण्यास असमर्थता दर्शवली. यावरून इतके नक्की झाले की रोहित म्हस्के हा इसम चालवत असलेल्या “लेमन स्पा” मध्ये नक्कीच वेश्याव्यवसाया सारखी असामाजिक कृत्ये केली जात असावीत.
आता प्रश्न असा पडतो की स्थानिक पोलीस नेमके काय करत असतात. ज्या अर्थी माध्यमांकडे थेट तक्रारी येतात म्हणजे पोलिसांकडेही विविध माध्यमांतून तक्रारी येत असणार. मग गेल्या आठवड्यात जशी दादर येथील उच्चभ्रू इमारतीतील स्पा वर स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली तशीच येथे करावी लागणार असेच दिसते. अशा ठिकणी जो वेश्याव्यवसाय चालतो त्यात जबरदस्तीने, परिस्थितीने गांजलेल्या मुलींची अब्रू वेशीवर टांगण्याचं काम ही दलाल मंडळी करत असतात. अशा गोष्टींमुळे स्पा सारख्या व्यवसायात उतरण्यासही कोणी तयार होत नाही. टीम महाराष्ट्र वार्ता या अशा समस्यांची आधीपासूनच गंभीर दखल घेत वेळोवेळी प्रशासनावर प्रामाणिकपणे कारवाई करण्याबाबत दबाव टाकत आलेली आहे. शिवसेना प्रणित महाशिवआघाडीच्या राज्यात अशा प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होण्याबाबत आम्ही आशावादी आहोतच. किंबहुना येत्या काळात यासाठी नवीन व कठोर कायदा करण्यात यावा याबाबतही आम्ही गृह खात्याकडे पाठपुरावा करू.
