Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खारघरमध्ये केंद्रीय संचार ब्युरोमार्फत मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

केंद्र सरकारच्या विविध सरकारी योजना, उपक्रम यांची माहिती मिळवण्याची संधी

पनवेल, दि. ६: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने नवी मुंबईतील लिटल वर्ल्ड मॉल, खारघर येथे मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून येथे येत्या ७, ८ आणि ९ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.

सदर मल्टीमीडिया प्रदर्शनात केंद्र सरकारमार्फत गेल्या ९ वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांच्याबाबत माहिती चित्रे आणि डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येईल. भारतीय टपाल विभागांच्या विविध योजना आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षसंदर्भात माहितीही यामध्ये मिळेल. सोबतच स्थानिक तहसील कार्यालयामार्फत मतदार नोंदणी शिबीरही यावेळी राबवण्यात येईल.

पनवेल आणि खारघर परिसरातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळून त्याचा लाभ घेता यावा, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. मल्टीमीडिया प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून खारघर, पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *