देवेंद्र फडणवीसांवर नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे माध्यमांसमोर झाले व्यक्त
खडसे यांचा राजीनामा आपल्याकडे आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली इथं सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत आपण काही बोलणार नाही असं पाटील यांनी नमूद केलं.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट केली. गेल्या ४० वर्षांत भाजपा जिथं पोहोचला नव्हता, तिथे तो आपण पोहोचवला, पक्षानं देखील आपल्याला बरंच काही दिलं. तसंच पक्षाच्या नेत्यांवर अथवा पक्षावर आपला जराही राग नाही, असं एकनाथ खडसे यांनी पत्रकारांना सांगितलं.
पक्ष सोडताना आपल्याला खंत असल्याचं ते यावेळी म्हणाले. येत्या शुक्रवारी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज पक्षाच्या कार्यालयात माध्यमांशी बोलत होते.
