Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय

भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची दमदार कामगिरी

पुणे, दि. २: कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेदवार रवींद्र धंगेकर ११,०४० मतांनी विजयी झाले आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा हा ऐतिहासिक विजय आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. प्रदीर्घ काळापासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्याने महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

कसबा पोटनिवडणुकीत एकूण ५०.०६ टक्के मतदान झाले. येथून दोन लाख ७५ हजार ६७९ मतदारांपैकी १ लाख ३८ हजार ०१८ मतदारांनी मतदान केले. मतमोजणीपूर्वीच काँग्रेस भाजपच्या हातून पारंपरिक मतदारसंघ हिसकावून घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. जे आजच्या निकालाने सिद्ध झाले.

कोण आहेत रविंद्र धंगेकर?

रवींद्र धंगेकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि शिवसेनेची युती असलेल्या महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार आहेत. रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासेनेंच्या विरोधात निवडणूक लढवली. कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली. कसबा विधानसभा मतदारसंघ हा दीर्घकाळापासून भाजपचा बालेकिल्ला आहे. रवींद्र धंगेकर हे पाच वेळा नगरसेवक असून त्यांनी पुणे महानगरपालिकेत (पीएमसी) शिवसेना आणि मनसेचे दोनदा प्रतिनिधित्व केले आहे.

२०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. मनसेमध्ये असताना रवींद्र धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू होते आणि त्यांना पीएमसीमध्ये पक्षाचे नेतेही करण्यात आले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *