अमली पदार्थ नियंत्रण विभागामार्फत निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला नोटीस
मुंबई: अमली पदार्थ नियंत्रण विभागाने(एनसीबी) चित्रपट निर्माते दिग्दर्शक करण जोहर यांना नोटीस पाठवली आहे. २०१९ मध्ये जोहर यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं.
त्याची चित्रफीत व्हायरल झाली असून त्या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी बहुतांश जण, धुंदीत असल्याचं दिसत होतं. या संदर्भात सविस्तर खुलासा व्हावा असं या नोटीशीत म्हटलं आहे. दरम्यान जोहर यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर एनसीबी ने आपला मोर्चा बॉलीवूड मधील स्टार्स मंडळींकडे वळवला.
