चौकीदारामुळे देश बर्बाद होत चालला आहे – कन्हैयाकुमार
एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खातेही आर्थिक संकटात सापडल्याने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणुक लढवणारे वादग्रस्त विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली आहे.
‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज २० तास काम करतात म्हणूनच देश उद्ध्वस्त झाला आहे’ अशी टिका कन्हैयाकुमार यांनी मोदींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
कन्हैयाकुमार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खात्याचीही परिस्थिती बिकट झाली आहे. टपाल खात्याला १५ हजार कोटींचा तोटा झाला आहे. देश उगाच नाही उद्ध्वस्त होत आहे. चौकीदार साहेब यासाठी रोज २० तास काम करत आहेत तेही कोणतीही सुट्टी न घेता.’
बीएसएनएल आणि एअर इंडियाच्या पेक्षा अधिक तोटा भारतीय टपाल खात्याला सहन करावा लागत आहे. याच बातमीच्या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
एयर इंडिया, BSNL, HAL के बाद अब भारतीय डाक विभाग की भी हालत ख़राब हो गई है और उसे 15,000 करोड़ रु. का घाटा हुआ है। देश यूँ ही बर्बाद नहीं हो रहा, चौकीदार साहेब ने इसके लिए हर दिन 20 घंटे काम किया है, वह भी बिना कोई छुट्टी लिए।
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) April 17, 2019
