कामोठे परिसरात एकाच परिवारातील ५ जणं कोरोना पॉसिटीव्ह; जाणून घ्या पनवेल मनपा हद्दीतील आजचे कोरोना अपडेट्स
पनवेल: आज पनवेल महानगरपालिका हद्दीत ऐकूण नव्या २० कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यात कामोठे परिसरातील एकाच कुटूंबातील ५ जणं पॉसिटीव्ह निघाल्यामुळे काहीसं चिंतेचं वातावरण परिसरात पसरलं आहे. कामोठे परिसरात ११, नवीन पनवेल परिसरात ६ तर तळोजे, नावडे व पनवेल तक्का येथे प्रत्येकी १ रुग्ण आज दिवशी कोरोना पॉसिटीव्ह निघाले आहेत.
आज आढळलेल्या नव्या रुग्णांत जवळपास सर्व रुग्ण व त्यांचे कुटुंबीय कामाच्या ठिकाणी संसर्गित झाल्याचे दिसते आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत आज एकूण १२ रुग्णांना पूर्ण बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. या विभागात आज पर्यंत ३७१ रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह निघाले असून व त्यातील २०८ रूग्ण पूर्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. यात एकूण मृत्यू १६ झाले असून १४७ रुग्ण अद्याप कोरोनाशी लढत आहेत.
विशेष टीप :
आजची महाराष्ट्रातील-देशातील आकडेवारी पाहिल्यावर जाणवते की आता लोकांना खरंच कोरोनासोबत जगण्याची कला आत्मसात करावीच लागेल. आता कोरोनाच्या या विषाणूशी लढताना सामान्यजनांना घाबरून जाणे चालणार नाही. आपण बरे होऊ शकतो फक्त थोडीशी अधिक काळजी घ्यावी लागेल हे नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसात ‘महाराष्ट्र वार्ता’ कोरोना शी निगडित बातम्या हळूहळू कमी करणार आहे कारण महाराष्ट्रात इतरही अनेक विषय आहेत ज्याकडे गेले काही महिने बरेच दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन जस-जसा शिथिल होईल तसतसे आपल्याला कोरोना व्यतिरिक्त इतर समस्यांशीही दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचा दैनंदीन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहण्यासाठी ‘महाराष्ट्र वार्ता’ ने आपल्या बातम्यांबाबत हा निर्णय घेतला आहे याची सबंध महाराष्ट्रातील आमच्या वाचकांनी नोंद घ्यावी. आपली समस्या अंतर्गत विषय आता आपण news@maharashtravarta.com वर पाठवू शकता.
