Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुरुष व महिला औद्योगिक कामगारांसाठी २ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

पुरुष व महिला औद्योगिक कामगारांसाठी २ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मुंबईदि. ३१ : राज्य कामगार विभागांतर्गत कामगार कल्याणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठी २७ वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि महिलांसाठी २२ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे. ही स्पर्धा हुतात्मा बाबू गेनूगिरणी कामगार क्रीडा भवन प्रभादेवीयेथे होणार आहे.

या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन २ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता कामगार मंत्री डॉ. सुरेश  खाडे आणि शालेय शिक्षणमराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरखासदार राहुल शेवाळेआमदार कालिदास कोळंबकरप्रधान सचिव विनिता वेद-सिंगलअपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल आदींच्या उपस्थितीत होणार आहे. विकास आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोडकामगार आयुक्त सतीश देशमुखजिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरकल्याण आयुक्त रविराज इळवे यावेळी उपस्थित राहणार आहेतअसे कळविण्यात आले आहे.

Photo Source – Google

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *