मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी घेतलेल्या कष्टांना सलाम करण्यासाठी घेतला निर्णय
पुणे/जुन्नर, दि.२३: गतवर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून शिवसेनेत घरवापसी केलेले पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शरद सोनवणे हे आज कोविड पॉजिटिव आले असून त्यांनी मुंबईत मल्टी स्पेशियालीती रुग्णालयात उपचार घेण्याचे टाळून स्थानिक कोविड केंद्रात उपचार घेण्याचे ठरविले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात प्रशासकीय यंत्रणा योग्य दिशेने राबवण्यासाठी घेतलेल्या कष्टांचा मान राखण्यासाठी शरद सोनवणे सरकारी कोविड केंद्रात उपचार घेत असल्याचे तसेच किमान आपल्या उपचार काळात येथील यंत्रणेतील त्रुटींवर मात करता येईल असे शरद सोनवणे म्हणाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अपक्ष उमेदवार आशा बुचके यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अतुल बेनके यांना त्याचा फायदा झाला होत शरद सोनवणे पराभूत झाले. आता सरकारी कोविड सेंटर मध्ये करोनावर उपचार घेण्यासाठी दाखल होत असल्यामुळे शरद सोनवणे पुन्हा एकवार चर्चेत आले आहेत.
