चार न्यायाधीशांना बढती; ‘या’ न्यायालयांच्या न्यायाधीश पदावर नियुक्ती
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चार न्यायाधीशांना बढती देत त्यांची जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, तेलंगण आणि मद्रास न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, न्यायाधीश डॉक्टर एस. मुरलीधर ओडिशा उच्च न्यायालयाचे, तर न्यायाधीश हिमा कोहली या तेलंगणच्या मुख्य न्यायाधीश असतील.
न्यायाधीश पंकज मिथल यांची जम्मू- काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर, न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
