महाराष्ट्र| ग्रामीण डाकसेवक नोकरभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायची मुदत १० जुन पर्यंत वाढवली
मुंबई, दि.३१: महाराष्ट्र पोस्ट सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाकसेवक नोकरभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक आता १० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी ती २६ मे पर्यंत होती.
कोरोना आणि तौक्ते चक्रीवादळाची परिस्थिती लक्षात घेता ही तारीख वाढवण्याची मागणी लोकाधिकार समिती सरचिटणीस अजित परब यांनी मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल यांना पत्राद्वारे केली होती.
Source – AIR
