Jitendra Joshi Tweetr
#PulwamaAttack पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ जितेंद्र जोशीची भावुक कविता सोशल मीडियावर व्हायरल
गुरुवारी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या हल्ल्याच्या विरोधात बॉलिवूडबरोबरच, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर कविता पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. जितेंद्र जोशीने ट्विटरबरोबरच फेसबुक व इन्स्टाग्रामवरही ही कविता पोस्ट केली आहे.
https://www.instagram.com/p/Bt4vGTElQoG/?utm_source=ig_web_copy_link
