Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले “ट्रम्प यांची मी निंदा करतो”

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले “ट्रम्प यांची मी निंदा करतो”

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाच निषेध केला. त्याला कारणही तसंच होतं. आज अहमदाबाद येथे आगमन झाल्यावर ट्रम्प थेट महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात गेले. यावेळी आपल्या भाषणादरम्यान ते महात्मा गांधींचा उल्लेख करण्यास विसरले. याचाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुजरातमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. परंतु, हा आश्रम ज्या एका नावामुळे ओळखला जातो त्या महात्मा गांधीजींचा साधा उल्लेखही केला नाही. ट्रम्प यांना भारताचा इतिहास माहीत नसेल तर ही अत्यंत दुदैवी बाब आहे. ट्रम्प यांची मी निंदा करतो.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *