गृहनिर्माण मंत्री आव्हाड म्हणाले, “त्यांना ‘महाराष्ट्र पॅटर्न’ काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा”
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूदराबाबत टीका करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरोधकांना विशेषतः भाजपला एक ट्विट करत टोला लगावला आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “कोविड-19 मृत्युदर :-
गुजरात : 6.25%
महाराष्ट्र : 3.73%
महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना ‘महाराष्ट्र पॅटर्न’ काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा.”
कोविड-19 मृत्युदर :-
गुजरात : 6.25%
महाराष्ट्र : 3.73%महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो , जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना 'महाराष्ट्र पॅटर्न' काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 16, 2020
गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढतीच आहे. देशात सध्याच्या घडीला महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. पण सध्या मृत्यदरात झालेली घट ही काहीशी दिलासादायक बाब आहे. पण राजकीय पटलावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडलेले पाहायला मिळत आहेत.
