होम क्वारंटाईन असलेल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांवर चंद्रकांत पाटलांच ट्विट
पुणे/कोल्हापूर: भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणतात की, “राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तब्येतीला आराम मिळावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना!” काहीसं खोचक असं हे ट्विट आहे असे म्हणू शकतो. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाईन आहेत.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री @Awhadspeaks यांच्या तब्येतीला आराम मिळावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 23, 2020
चंद्रकांत पाटील यांच्या या ट्विटवर मग काही नेटकाऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.
@ChDadaPatil , चंपा जी आता तरी खालच्या दर्जाचे राजकारण करणे सोडा, लोकांना मदत करा कोथरूड तुमची वाट बघतय.
— Sam Yangad (@skyangad) April 23, 2020
