पुण्यात जहांगीर रुग्णालयात रुग्णाच्या सूप मध्ये आढळली रक्ताचे डाग असलेली पट्टी
पुणे शहरातल्या प्रतिष्ठित अशा जहांगीर रुग्णालयात ऍडमिट असलेल्या एका महिला रुग्णाला देण्यात आलेल्या सूप मध्ये रक्ताने माखलेली पट्टी आढळल्याची घटना समोर आली आहे. या महिलेच्या पतीने याची तक्रार पोलीसांना केली आहे. या विषयावर हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे की काही कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यांनी जाणून बुजून असे केले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, महेश सातपुते यांनी आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी जहांगीर हॉस्पिटल मध्ये भरती केलं होतं. ते म्हणाले की, “मी माझ्या पत्नीला २९ एप्रिल ला या हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं आणि त्याच दिवशी तिने एका मुलीला जन्म दिला. काल रविवारी माझ्या पत्नीला सूप चे बाउल देण्यात आले. मला त्यात काहीतरी दिसलं आणि मी ते बाजूला केलं. ती रक्ताचे डाग असलेली कापसाची एक पट्टी होती.”
या बाबत बराच वाद घातल्यानंतर रुग्णालयाचे अधिकारी म्हणाले की काही संपावरील कर्मचाऱ्यांचे हे कृत्य असू शकते. रुग्णालय प्रशासन अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया करत आहे.
सातपुते यांनी नंतर शिवाजीनगर पोलीस स्थानकात हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली. तसेच पोलिसांना पुरावा म्हणून विडिओ दिला आहे.
शेअर करा । LIKE करा । कंमेंट करा
