Jayant Patil Twt
अभिनंदन वर्थमानपेक्षा पंतप्रधानांना पक्षाचा मेळावा अधिक महत्वाचा – जयंत पाटील यांची टीका
पुलवामा हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तनामध्ये घुसून एअर स्टाईक केले होते, त्यांनतर भारतीय हद्दीत पाकिस्तानने हवाई हल्ला केला त्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या कारवाईत भारताचे एक मिग 21 ह्या विमानचा अपघात होत ते विमान पाकिस्तनामध्ये कोसळले त्या विमानातील वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तन सरकारने कैद केले आहे.
वैमानिक अभिनंदन वर्थमान यांपेक्षा नरेंद्र मोदींना आपल्या पक्षाचा मेळावा खूप महत्त्वाचा आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
भारताचे एक मिग 21 या विमानाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तान सरकाने पकडले आहे. अभिनंदन यांना पाकिस्ताने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हि आपल्यासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. आपण सर्वानी एकत्र येऊन अभिनंदन वर्थमान यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्व देश अभिनंदन यांच्यासाठी प्रार्थना करत आहे मात्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या भारतीय बूथ कमिटीतील १५ हजार अध्यक्षांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भेट घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशापेक्षा आपल्या पक्षाचे हित अधिक महत्त्वाचे वाटते,अशी तीव्र टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
